« Back

जीपच्या धडकेने रिक्षातील तिघांचा मृत्यू

पिंपरी - भरधाव जीपची रिक्षाला धडक बसून झालेल्या अपघातात रिक्षाचालकासह तिघांचा मृत्यू झाला असून, दोन जण जखमी झाले आहेत. औंध-रावेत रस्त्यावरील वाय जंक्‍शनजवळ (वाकड फाटा) बुधवारी (ता. 12) पहाटे अडीचच्या सुमारास हा अपघात झाला.