About Us About Us

ऐतिहासिक ठिकाणे

सिंहगड सिंहगड :- पुर्वी कोंढाणा या नावाने ओळखला जाणारा सिंहगड हा किल्ला पुण्यातील एक सुप्रसिध्द व लोकप्रिय किल्ला आहे. हा किल्ला हवेली तालुक्यातील डोणजे गावात आहे. हा किल्ला पुणे शहरापासून 25 कि.मी. अंतरावर असून तो 1290 मी. उंचीवर आहे. छत्रपती शिवाजी महराजांचा विश्वासू व शूर सरदार तानाजी मालुसरे यांचे याच ठिकाणी मुघल सत्तेशी युध्द झाले. तानाजी मालुसरेंच्या मृत्युची बातमी ऐकुन छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले " गड आला पण सिंह गेला" त्यानंतर त्यांनी कोढाणा किल्ल्याचे नाव बदलून सिंहगड असे ठेवले. आगाखान पॅलेस गांधी मेमोरियल सोसायटीचे आगाखान पॅलेस हे इटालियन आर्चेस व लॉन आहे. ब्रिटीशांनी या जागेचा उपयोग महात्मा गांधी, कस्तुरबा गांधी व महादेवभाई देसाई यांचेसाठी भारत झोडो आंदोलनात तुरुंग म्हणुन केला होता. कस्तुरबा व महादेवभाई यांनी याच जागेत अखेरचा श्वास घेतला त्यामुळे या ठिकाणी त्यांचे स्मरणार्थ संगमरवरी स्मारक बांधण्यात आले. शनिवारवाडा पहिला बाजीराव पेशवा यांनी सन 1736 साली 13 खोल्यांचा पेशव्यांचा राजवाडा म्हणजेच शनिवार वाडा बांधला. हा वाडा पेशव्यांचे मुख्य ठिकाण होते. हे पुण्याच्या संस्कृतीचे प्रतिक आहे. सुरक्षिततेला जास्त प्राधान्य देऊन शनिवारवाडयाची रचना करण्यात आलेली आहे. शनिवार वाडयाचे मुख्य प्रवेशद्वार दिल्ली दरवाजा या नावाने व इतर दरवाजे गणेश, मस्तानी, जंभळ, खिडकी अशा नावांनी ओळखले जातात. शनिवार वाडयासमोर पहिल्या बाजीरावाचा घोडयावर बसलेला पुतळा आहे. शनिवारवाडयात गणेश महल, रंग महल, आरसा महल, हस्तीदंत महल, दिवाणखाना आणि कारंजे अशी अनेक ठिकाणे पाहावयास मिळतात. पेशव्यांचा इतिहास सांगणारा लाईट व म्युझिक शो शनिवार वाडयावर दररोज आयोजित केला जातो. पेशव्यांची सत्ता असलेला हा राजवाडा सन 1928 मध्ये आगीमुळे नष्ट झाला. आता फक्त राजवाडयाच्या मजबूत तटबंदी असणा-या भिंती व सुरक्षिततेसाठी अणकुचीदार टोक असणारा भक्कम दरवाजा शिल्लक आहे. पर्वती र्वती हे पुण्याचे स्थान दर्शविणारे प्रसिध्द ठिकाण आहे. पर्वतीची टेकडी ही जरी शहराच्या दक्षिणेकडील भागात असली तरी सुध्दा ती शहराच्या जवळजवळ सर्वच भागातून दिसू शकते. मंदिराला 8 पाय-या आहेत ज्या पार्वती व देवडेश्वरांना अर्पण केलेल्या आहेत. तेथे विष्णु, गणेश व कार्तिकस्वामी यांचेही मंदिर आहे. टेकडीच्या माथ्यापर्यंत चढून गेल्यावर आपल्याला सर्व बाजूने पुणे शहराचे सुंदर दर्शन घडल्याचा आनंद लुटता येतो. राजगड किल्ला राजगड हा किल्ला पुण्यापासून सुमारे 85कि.मी. अंतरावर असलेल्या गुंजवणे गावात आहे. हा किल्ला शिवाजी महाराजांचा खास किल्ला होता तसेच तो त्यांची पहिली राजधानी सुध्दा होता. त्यामुळे या किल्ल्याला फार मोठी ऐतिहासिक प्रसंगोचितता आहे. राजगडाला फसवा प्रवेश, नागमोडी वळणाचे अरुंद रस्ते आणि तटासारखी संरक्षण देणारी फसवी पोलादी भिंत आहे. प्रचंड पाली गेट, नेध किंवा एलिफन्ट आईज अजूनही आहेत. राजगडाच्या माथ्यावरुन सहयाद्रीच्या रांगांचे भव्य दर्शन होते. तोरणा किल्ला हा किल्ला पुण्यापासून 65कि.मी.दूर वेल्हा येथे वसलेला आहे.शिवाजी महाराजांनी जिंकलेल्या किल्ल्यांपैकी हा पहिला किल्ला आहे. पुरंदर आणि वज्रगड किल्ला हे दोन्ही किल्ले पूरंदर तालूक्यात वसलेले असुन ते एकमेंकांना जोडलेले आहेत.काही वर्षे हा किल्ला शिवाजी महाराजांची राजधानी होता. छत्रपती शिवाजी महाराजांचा मुलगा छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म या किल्ल्यावर 1665 साली झाला. हा किल्ला पेशव्यांची पहिली राजधानी होता.आता हा किल्ला नॅशनल कॅडेट कॉर्पोरेशन यांच्या ताब्यात आहे. संभाजी महाराज समाधी धर्मवीर संभाजी महाराजांची समाधी पुणे_नगर महामार्गावरील वडु-बुद्रुक येथे आहे.ते कोरेगाव पासून 3-4 कि.मी.अंतरावर भिमा नदीच्या काठी आहे.

धार्मिक स्थळे

कसबा गणपती

कसबा गणपती हे पुण्याचे ग्रामदैवत आहे. कसबा गणपती लाल महालाजवळ असून पुण्यातील पहिला मानाचा गणपती आहे. त्यामुळे या गणपतीला गणेश उत्सव मिरवणुकीत पहिल्या मानाचे स्थान असते. शिवाजी महाराजांची आई जिजाबाई यांनी गणपतीच्या मुर्तीची स्थापना केली. दादोजी कोंडदेव यांनी त्यांचे वतीने गणपतीच्या पुतळयासमोर तंबू बांधला. आता ते पुण्यातील प्रसिध्द मंदिर आहे.

भीमाशंकर

भीमाशंकर येथे भीमा नदीचा उगम झाला आहे. भीमाशंकर पुणे शहरापासून 125 कि.मी. अंतरावर खेड तालुक्याजवळ आहे. हे महाराष्ट्रातील पाच जोतिर्लिंगांपैकी एक जोतिर्लिंग आहे. नाना फडवणीसांनी या ठिकाणी शंकराचे मंदिर बांधले होते. भीमाशंकरच्या जवळच मनमाडच्या टेकडया आहेत. या टेकडयांवर भुतींग, अंबा-अंबिका, व भीमाशंकर यांच्या कोरीव लेण्या आहेत. मान्सून आणि थंडीच्या दिवसांत भीमाशंकरच्या सौंदर्यात अधिक भर पडते. भीमाशंकर हे राखीव जंगल आहे आणि तेथे जंगली प्राण्यांचे अभयारण्य आहे. ज्यामध्ये अनेक प्रकारचे प्राणी, पक्षी, झाडे व फुले पहायला मिळतात.

बनेश्वर

पुण्यापासून 30 कि.मी. अंतरावर असलेले बनेश्वर हे एक अतिशय सुन्दर ठिकाण आहे. येथे पहिल्या बाजीराव पेशव्यांनी बांधलेले महादेवाचे मंदिर आहे. या ठिकाणी विष्णु, लक्ष्मी, महादेव यांच्या नेत्रदिपक मुर्ती असून तेथे पाच शिवलिंगही आहेत. मंदिर खोल अशा झाडा मध्ये असल्यामुळे ते एखाद्या जंगलासारखे दिसते म्हणून त्याला बनेश्वर असे म्हणतात. सुन्दर बागा, लहानलहान धबधबे, व पाण्याचे ओहोळ यांमुळे बनेश्वर हे एक सहलीचे ठिकाण बनले आहे.

चतुः शृंगी मंदीर

चतुः शृंगी मंदिर ही एक लहान टेकडी आहे जी दुर्गा देवीला अर्पण केलेली आहे. या आधी तेथे अंबेश्वरी ही देवता होती. वर्षातून एकदा अश्विन महिन्यात येथे नवरात्री जत्रा भरते. हे देऊळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात बांधले गेले.

जेजूरी

जेजुरी हे पुण्यापासून 40 कि. मी. अंतरावर असून तेथे खंडोबाचे प्राचीन मंदिर असल्यामुळे ते खंडोबाची जेजुरी म्हणुन ओळखले जाते. चैत्र, मार्गशीर्ष, पौष व माघ महिन्यात येथे जत्रा भरते. मंदिरात जाण्याच्या वाटेवरुन आपल्याला दिवे घाट दिसतो. या मंदिरातील दिपमाला प्रसिध्द आहे. मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी 200 पाय-या चढून जावे लागते. शिवाजी महाराज व संभाजी महाराजांनी याच ठिकाणी मुघल सत्ते विरुध्द व्यूहरचना करण्याबाबत चर्चा केली. त्यामुळे जेजुरीला ऐतिहासिक महत्व प्राप्त झाले. त्या काळातील बरीचशी शस्त्रे आपल्याला तेथे पाहायला मिळतात.

अष्टविनायक

गणपती बाप्पा हे त्याच्या भक्तांचे रक्षणकर्ता असतात. निसर्गाने शिल्पाकृती केलेल्या अशा गणपतीच्या आठ प्रतिमा निसर्गात सापडल्या आणि त्या जेथे सापडल्या तेथेच त्यांची मंदिर बांधून स्थापना करण्यात आली. या सर्व प्रतिमा स्वयंभू आहेत. या अष्टविनायकांपैकी मोरगावचा मोरेश्वर, थेऊरचा चिंतामणी, रांजणगावचा महागणपती, ओझरचा विघ्नहर व लेण्याद्रीचा गिरीजात्मक हे पाच गणपती पुणे जिल्हयात आहेत.

देहू

देहू हे संत तुकाराम महाराज यांचे जन्मस्थान असून ते इंद्रायणी नदीच्या काठी वसलेले आहे. या ठिकाणी भाविक मोठया प्रमाणात येत असतात. हे पुण्यापासून 34 कि.मी. अंतरावर आहे.

आळंदी

आळंदी पुण्यापासून 25 कि.मी. अंतरावर आहे. आळंदी सर्वतोमुखी देवाची आळंदी म्हणून ओळखली जाते. येथे संत कवी ज्ञानेश्वर महाराज यांचे मंदिर व समाधी आहे. हे मंदिर सन 1570 मध्ये बांधण्यात आले. संत ज्ञानेश्वर महाराजांनी भगवद्गीतेचे मराठीत रुपांतर केले त्याला ज्ञानेश्वरी असे म्हणतात. आळंदीमधील विठ्ठल-रुक्मीणी मंदिर, राम मंदिर, कृष्ण मंदिर व मुक्ताई मंदिर ही आळंदी मधील आणखी काही प्रसिध्द ठिकाणे आहेत. संत ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांच्या आयुष्यातील जास्तीत जास्त काळ आळंदीतच घालवला. आषाढ महिन्यात यात्रेकरु पालखी बरोबर आळंदी ते पंढरपूर जवळजवळ 150 कि.मी. अंतर चालून जातात.प्रसिध्द भिंत ज्यावर बसून ज्ञानेश्वर महाराज चांगदेवांना भेटायला गेले ती भिंत अजूनही आळंदी येथे आहे.

नारायणपूर

पुण्याच्या दक्षिण भागात नारायणपूर गावात संत चांगदेव व श्री दत्ताचे प्रसिध्द मंदिर आहे. यात्रेकरु या ठिकाणी येऊन जुन्या औदुबराच्या झाडाची पुजा करतात व नारायणेश्वर मंदिराला भेट देतात. या मंदिरातील शिल्पाकृती ही यादव कालीन आहे.

पर्यटन स्थळे

नावाप्रमाणेच या उद्यानामध्ये साप, सरपटणारे प्राणी, पक्षी, कासवे यांचा संग्रह आहे. येथे सापाच्या 160 प्रजाती आहेत. श्री. निलमकुमार खैरे यांनी सन 1986 मध्ये या उद्यानाची स्थापना केली. त्यानंतर हे उद्यान सन 1999 मध्ये राजीव गांधी उद्यानामध्ये समाविष्ट करण्यात आले. त्यात आता प्राणीसंग्रहालयाचा देखील समावेश करण्यात आलेला आहे. हे उद्यान पुण्यापासून 8 कि.मी. अंतरावर पुणे-सातारा रोडवर भारती विद्यापीठाजवळ आहे. 

पुणे शहरातील डेक्कन जिमखान्या जवळ बालगंधर्व रंगमंदिराला लागून असलेली ही एक पुण्यातील अतिशय सुंदर बाग आहे. मत्सालय व छोटासा किल्ला हे या बागेतील प्रमुख आकर्षण आहे. विविध प्रकारची झाडे, फुले, ताजे हिरवेगार गवत व कारंजी या उद्यानाच्या सौंदर्यात भर टाकतात.

अप्पू घर हे निगडी पासून 2 कि.मी. व पुणे शहरापासून 22 कि.मी. अंतरावर आहे. हे दिल्लीच्या अप्पूघरासारखेच आहे. तेथे असलेले असंख्य खेळ, गंमती व बागडण्यासाठी पर्यटक आतुरतेने वाट पहात असतात. अप्पू घरात वॉटरपार्कची सोय सुध्दा आहे. असंख्य खेळांमध्ये लहान मुले रमून जातात तर तेथे असणारे सुन्दर थंडगार तळे, दुर्गामातेचे मंदिर व फिरण्याकरिता मोठया टेकडया सर्व पिढीतील लोकांना आकर्षित करतात.

ही बाग पुणे शहरात स्वारगेट जवळ आहे. बागेमध्ये हिरवेगार टवटवीत गवत आहे तसेच बागेमध्ये व्यायामासाठी असणारा पादचारी मार्ग आहे. बागेमध्ये तळयाने वेढलेली एक लहान टेकडी आहे. या टेकडीवर गणपतीचे मंदिर आहे. ही जागा " तळयातला गणपती " म्हणून प्रसिध्द आहे. पेशवे पार्क ही सारस बागेच्या शेजारी आहे. पुर्वी ही बाग प्राणी संग्रहालयासाठी प्रसिध्द होती. या ठिकाणी बोटींग करण्याची सोय आहे. या ठिकाणी "फुलराणी" नावाची एक छोटीशी रेल्वे आहे जी लहान मुलांना खूप आकर्षित करते.

पुभाटघर धरण पुण्यापासून 40 कि.मी. अंतरावर असून हे एक सुंदर नैसर्गिक देखावा असलेले ठिकाण आहे. हे धरण वळवंडी नदीवर बांधलेले आहे. हे भारतातील सर्वात जास्त उंचीचे धरण आहे. भाटघर धरणाच्या आजूबाजूच्या परिसरात सुदंर बगीचे व वॉटर स्पोर्ट यांची योग्य निर्मिती करण्यात आलेली आहे.

हे ठिकाण पुण्याजवळ पश्चिम दिशेला आहे. आत्ताच्या काळात हे ठिकाण सहलीसाठी एक आकर्षण म्हणून प्रसिध्द आहे. मुळशी तालुक्यातील मुळशी या लहानशा गावाचे निसर्ग सौंदर्य पर्यटकांना आकर्षित करते. "वळणेवाडी" नावाचे तळे मुळशी पासून 5 कि.मी. अंतरावर आहे. हे गाव सहयाद्रीच्या रांगांमध्ये आहे. तेथे जवळच घनदाट जंगल असुन धनगड व कोरीगड यांसारखे आश्चर्यकारक किल्ले आहेत. याशिवाय हे ठिकाण पर्वतांसाठी व "लवमई " नावाच्या पठारासाठी प्रसिध्द आहे. हत्तीहंत, पागोटा नावाच्या आश्चर्यकारक टेकडया ज्यांची उंची जवळजवळ 1000 कि.मी. इतकी आहे. या सर्व गोष्टीं व्यतिरिक्त मुळशी हे ठिकाण वीज निर्माण करणा-या मुळशी धरणासाठी प्रसिध्द आहे.

Map Map

map

Flash News Flash News

जीपच्या धडकेने रिक्षातील तिघांचा मृत्यू
पर्यटन स्थळे

Navigation Navigation

Today's Weather Today's Weather

Weather Data not found

Visit Other Sites Visit Other Sites

Go to:     Ministry of Panchayati Raj

Related Details Related Details

General Profile of Panchayat
Elected Member Details
Panchayat Official Details
Committee Details
Execution Status of ActionPlan
Annual Receipt and Payment
Monthly Reconciliation Statement
Inventory Stock Register
Day Book Report
Ledger report
Register of advance
Opening Balance
List of Assets
Minutes Of Meeting
Upcoming Meetings
Trainings Conducted
Trainings Attended by Officials
Photo Uploaded through mAsset
Work Check List
Draft Plan Report
Action Plan Report